टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऊस दरावरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर देण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पहिला हप्ता २,८५० रुपये तात्काळ देण्यात येणार असून उर्वरित १५० रुपये दिवाळीपर्यंत अदा करण्यात येतील.

कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर कारखान्याच्या गव्हाणीत सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्णविराम मिळाला.
तालुक्यातील इतर खासगी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता ३ हजार रुपये जाहीर केल्यानंतर दामाजी कारखान्यानेही तसाच निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली होती.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेअरमन शिवानंद पाटील यांनी कारखान्याची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, तालुक्यातील एकमेव सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या या कारखान्याकडे खासगी साखर कारखान्यांप्रमाणे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प नाहीत.

तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रतिटन ३ हजार रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २,८५० रुपये तात्काळ आणि १५० रुपये दिवाळीला देण्यात येतील. या निर्णयानंतर ऊस दरावरून निर्माण झालेला तणाव निवळला आहे.

या आंदोलनात युवराज घुले, राहुल घुले, समाधान फटे, सिद्धेश्वर हेबांडें, दीपक भोसले, सचिन पाटील, श्रीमंत केदार, विजय रणदिवे, समाधान हेबांडे, अनिल बिराजदार, श्रीधर खांडेकर, निवास भोसले, पांडुरंग बाबर,

सिद्राय्या माळी, ज्ञानेश्वर बाबर, अभिमान बेदरे, आबा खांडेकर, रोहित भोसले, बाहुबली सावळे, किशोर दत्तू, शंकर संघशेट्टी, हनुमंत बेदरे, वैभव रणे, नारायण जगदाळे, अमोल बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन
दामाजी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार रुपये जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.- युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














