टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री.संत दामाजी साखर कारखान्याच्या हंगाम २०२१-२२ मधील दि.१६ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाचे अॅडव्हान्स बील २ हजार १०० प्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक श्री रमेश गणेशकर यांनी दिली.
सदर ऊस बीलाची रक्कम शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ब्रम्हपूरी, राजमाता अर्बन को – ऑप . बँक लि . , मंगळवेढा , यशोदा महिला नागरी सह. पतसंस्था मंगळवेढा , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा,
समर्थ सहकारी बँक शाखा मंगळवेढा, सोलापूर जिल्हा मध्य.सह . बँक , धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह . पतसंस्था मंगळवेढा, मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सह . पतसंस्था मंगळवेढा,
धनलक्ष्मी महिला ग्रामीण बि . सह . पतसंस्था , अरळी या ठिकाणी संबंधीत शेतकऱ्यांच्या नांवे वर्ग करण्यात आलेली आहे.
तसेच संपुर्ण हंगामाची तोडणी वाहतूक केलेल्या ठेकेदारांची तोडणी वाहतूक बिलाची रक्कम मा.बबनराव आवताडे नागरी बिगर शेती सह . पतसंस्था , मर्या . मंगळवेढा येथे वर्ग करण्यात आली आहे.
राज्य शासन येणाऱ्या हंगामाकरिता १ आक्टोबर पासुन गळीत सुरु करणेस परवानगी देणार असलेने कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२२-२३ करिता मशिनरी दुरुस्ती व साफ सफाईची कामे वेगाने सुरु असुन
दि. १५ सप्टेंबर पर्यंत कारखाना गळीतासाठी तयार करणेचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच २०२२-२३ हंगामा करिता ऊस तोडणी यंत्रणा भरती करणेसाठी ट्रक , ट्रॅक्टर, बैलगाडी चे करार करुन घेत असलेचे प्र.कार्यकारी संचालक श्री रमेश गणेशकर यांनी यावेळी सांगीतले.
सदर प्रसंगी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर गणपत घाडगे , चिफ केमिस्ट मोहन पवार, प्र.शेती अधिकारी पंडीत गायकवाड, पर्चेस ऑफिसर भारत निकम,
कार्यालय अधिक्षक दगडु फटे , सिव्हील इंजिनिअर प्रविण मोरे , स्टोअर किपर उत्तम भुसे , लेबर ऑफीसर आप्पासाहेब शिनगारे , सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे,
केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील , कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठ्ल गायकवाड , पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी सभासद शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज