टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या जुन्या व नविन झालेल्या सर्व सभासदांना गुढी पाडव्याला सवलतीच्या दराने दिली जाणारी
चांगल्या प्रतिची साखर प्रति किलो २० रुपये या दराने २५ किलो पॅकिंगमध्ये शेअर्स पुर्ण असलेल्या सभासदांना तालुक्यातील २८ केंद्रावर दि.२२ मार्च या कालावधीत वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच कारखान्याचे हंगाम सन २०२२-२३ मधील शिल्लक कोरडी प्रेसमड प्र।मे।टन रु।१३००/- या दराने मागेल त्या शेतकरी, सभासदांना देण्याची व्यवस्था करणेत आलेची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
साखर विक्री केंद्राचे ठिकाणी ओळखीचा पुरावा द्या
नविन सभासदांचे साखर कार्ड विक्री केंद्राचे ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी आपले गांव समाविष्ठ असलेल्या साखर विक्री केंद्राचे ठिकाणी ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, शेअर्स पावती) देवुन आपले कार्ड व साखर घेवुन जावे असे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी कळविले आहे.
तसेच संबंधीत केंद्रावर कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडून दर शुक्रवारी सकाळी १० ते सायं ५ या वेळेत डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात यांनी दिली.
सदर प्रसंगी व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे,
बसवराज पाटील,गौडाप्पा बिराजदार,प्रकाश पाटील,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज