टीम मंगळवेढा टाईम्स।
शिक्षणाचा अधिकार अंतर्गत शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनेकांना अर्ज सादर करताना सर्व्हर डाउनमुळे अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पालकांच्या विनंतीनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
मोफत शिक्षणाचा अधिकार आरटीई अंतर्गत सध्या शासनातर्फे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहे. मात्र, शासनाची वेबसाइट ही स्लो असल्यामुळे अनेक पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आरटीई २५ टक्केचे ऑनलाइन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन वेबसाइट स्लो होऊ शकते.
याचा विचार करत पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असा संदेश वेबसाइटवर दर्शविण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोलापूर जिल्ह्यात शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यावर्षी २९५ शाळा अॅडमिशनसाठी सज्ज असून दोन हजार २९७ जागांवर प्रवेश देणार आहेत.
यासाठी १ मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मार्च रोजी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र पालकांच्या विनंतीनुसार मदतवाढ मिळाली आहे.
आणखी आठ दिवस मुदतवाढ
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी १ मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. १७ मार्च रोजी अंतिम मुदत देण्यात आली होती.
मात्र, पालकांच्या मागणीवरून मुदत वाढ देण्यात आली असून २५ मार्च रात्री १२ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. मात्र, २५ मार्चनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज