टीम मंगळवेढा टाईम्स ।
ज्याप्रमाणे पीडित व्यक्तीसाठी शासनातर्फे त्यांची बाजू न्यायालयात मांडण्यास शासकीय अभियोक्ता यांची नियुक्ती केलेली असते.
त्याच धर्तीवर आरोपी किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यामध्ये विशिष्ट कारणास्तव जसे आर्थिक दुर्बलता, गरजूंना आपली बाजू मांडता यावी यासाठी लोकअभिरक्षक कार्यालयाच्या माध्यमातून निःशुल्क विधिज्ञ मिळणार आहेत.
यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडून निवड प्रक्रियेद्वारे ६ विधिज्ञांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार आर्थिकरीत्या दुर्बल, गरजू तुरुंगांधीनांसाठी राज्यातील २८ जिल्ह्यांत लोकअभिरक्षक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे.
ही प्रणाली ही विधिसहाय्य संरक्षण सल्लागार म्हणून ओळखली जाते. यामध्ये मुख्य विधि साहाय्य संरक्षण सल्लागार अॅड. स्नेहल राऊत, उपमुख्य विधि सहाय्य सल्लागार अॅड. महेश सोलनकर,
अॅड. शिवकैलाश झुरळे आणि सहायक विधि साहाय्य संरक्षण सल्लागार अॅड. रेवण पाटील, अॅड. देवयानी किणगी, अॅड. गुरुराज नवले हे या प्रणालीचे कामकाज पाहत आहेत.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. शब्बीर अहमद औटी ज्यांनी या प्रणालीच्या सल्लागार यांना शुभेच्छा दिल्या.(स्रोत:लोकमत)
बंदीसाठी आशेचा किरण ठरावा
लोकअभिरक्षक कार्यालय हे सर्वसामान्य आर्थिकरीत्या दुर्बल आणि तुरुंगबंदीसाठी आशेचा किरण ठरावा त्याप्रमाणे कार्यालयाने कार्य करावे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्यस्तरीय मध्यस्थी परिषदेत ऑनलाइन महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांतील लोक अभिरक्षक कार्यालयाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.
गरजू आणि पात्र व्यक्तींना या प्रणालीचा लाभ घ्यावा
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणअंतर्गत सदरील लोकअभिरक्षक कार्यालये १३ पासून कार्यान्वित झाली आहे. गरजू आणि पात्र व्यक्तींना निःशुल्क विधि सेवा पुरविली जात आहे. गरजू आणि पात्र व्यक्तींना या प्रणालीचा लाभ घ्यावा. न्या. नरेंद्र जोशी, सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज