टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ हंगामाकरिता ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे.टन रु.२७०१/- प्रमाणे पहिला हप्ता देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, या हंगामातील पहिल्या अकरा पोत्याचे पुजन प्रसंगी प्रति मे.टन रु. २५०१/- प्रमाणे पहिला हप्ता जाहिर केलेला होता. परंतु चालु गळीत हंगामामध्ये जिल्हयातील बऱ्याच साखर कारखान्यांनी सुधारीत जादा ऊस दर जाहिर केलेला आहे.
अपु-या पावसामुळे ऊसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. ऊस क्षेत्र कमी असुन हेक्टरी टनेजचे प्रमाणही घटलेले आहे. त्यामुळे साखर कारखानदारीमध्ये ऊसासाठी स्पर्धा निर्माण झालेली आहे.
याचा सारासार विचार करुन आज बोलावण्यात आलेल्या संचालक मंडळ सभेत प्रति मे.टन रु.२७०१/- प्रमाणे पहिला हप्ता देणेचा निर्णय घेतला आहे.
दामाजी कारखान्यावर कोणत्याही प्रकारचा उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसतानाही ऊस उत्पादक शेतक-यांच्या हितासाठी प्रति मे.टन रु.२७०१/- पहिला हप्ता जाहीर केलेला आहे.
दामाजी कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास असलेने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने चालू आहे. तरी शेतक-यांनी आपला ऊस संत दामाजी कारखान्यास गळीतास पाठवुन कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील,
गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय, शेती अधिकारी कृष्णात ठवरे, वर्क्स मॅनेजर परमेश्वर आसबे, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर यांचेसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज