टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पाटखळ मार्गावर निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून पाठीमागे बसलेल्या चुलतीस
खड्यात पाडून मेंदूस गंभीर दुखापत करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बंडू अर्जून काळे (वय ३०, रा.पाटखळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी सिध्देश्वर काळे हे व्यवसायाने टेलर असून मयत कोमल (वय ३७ रा.मेटकरवाडी) ही त्यांची पत्नी आहे.
सायंकाळी ५ वा . फिर्यादीचा पुतण्या तथा आरोपी बंडू अर्जुन काळे याचा कॉल आला. मी मंगळवेढ्याहून मेटकरवाडीकडे येत आहे.
वाटेत पाटखळ येथे चुलती कोमल यांची गाठ पडल्याने त्यांना एम.एच.१३/डी.व्ही. ८०२८ या मोटारसायलवरून घेवून येत असताना मोटारसायकलचा ताबा सुटल्याने ती खड्डयात जाऊन पडली.
यामध्ये चुलती कोमल या डोक्याला गंभीर मार लावून कानातून व डोक्यातून रक्तस्त्राव होऊन त्या बेशुद्ध पडल्या.
त्यांना प्रथमतः मंगळवेढ्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे जाण्यास सांगितले.
अॅम्ब्युलन्स बोलावून सोलापूर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये जखमी कोमल हिस दाखल केले. दि . २३ एप्रिल रोजी सकाळी ७.४७ वा. उपचारादरम्यान त्या मयत झाल्या.
याप्रकरणी पुतण्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक शिवाजी पांढरे यांनी गुन्हा दाखल करून पोलीस नाईक चनप्पा धानगोंडा यांचेकडे तपास दिला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज