टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका विधि सेवा समितीच्या वतीने न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतमध्ये ४०९ प्रकरणाचा निपटारा करुन १ कोटी २५ लाख, ७६ हजार ३१४ रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली.
एक विवाहित दांपत्यांतील पाच वर्षांचा वैवाहिक वाद मिटवून परत नांदण्यासाठी गेले. तसेच पाच वर्षाहून जुनी एकूण ८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर, यांच्या निर्देशानुसार सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यु.पी देवर्षी, तालुका विधि सेवा समिती मंगळवेढा अध्यक्ष श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या सहकायनि आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोक अदालत मध्ये एकुण २ पॅनल तयार करण्यात आलेले होते.
पॅनल क्रमांक १ चे पॅनल प्रमुख श्रीमती. एस. एन. गंगवाल दिवाणी व फौजदारी न्यायाधीश व पॅनल वकील म्हणून अॅड. व्ही. के मासाळ यांनी काम पाहिले त्यांच्याकडे दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.
तसेच पॅनल क्रमांक २ चे पॅनल प्रमुख श्रीमती. व्ही. के, पाटील दिवाणी न्यायाधीश क.स्तर, मंगळवेढा व पॅनल वकील म्हणून अॅड.एस.ए सावंत यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे दाखलपुर्व प्रकरणे, गुन्हा कबुल केलेली प्रकरणे, तसेच आय.पी.सी. १८८ ची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.
सदर लोक अदालतकरीता दिवाणी व फौजदारी प्रलंबित एकुण ४०९ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी दाखलपुर्व (बैंक, पतसंस्था, नगरपालीका, ग्रामपचायत यांच्या वसुलीची) एकुण ३५८ प्रकरणे आणि खटला चालू असलेली ४३ प्रकरणे निकाली करण्यात आलेली आहेत.
यांनी घेतले परिश्रम…
लोकअदालत यशस्वी करणेकरीता विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. यु. डी. माने, उपाध्यक्ष अॅड. व्ही. वाय. बेदरे, सचिव अॅड. जे.डी. मुल्ला तसेच इतर सर्व विधीज्ञ यांनी सहकार्य केले.
तसेच सहा. अधिक्षक एस. आर. रामदास, विधीसेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर व इतर नेमलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज