मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील १५०० रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. तर जे योजनेसाठी पात्र नव्हते, तरीदेखील अर्ज केले आहेत त्यांना आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही, याची धाकधूक आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी (कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न) लाडकी बहीण योजना आणली.
अवघ्या अडीच-तीन महिन्यांतच राज्यातील पावणेतीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ७४ हजारांवर महिला आहेत. जुलैपासून लाभ देण्यास सुरवात झाली, पहिल्यांदा दीड हजार रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर दोन-दोन महिन्यांचे दोन हप्ते वितरित झाले.
दिवाळीपूर्वी तीन हजार रुपये मिळाल्याने महिलांचा सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले. त्यांना आता दरमहा २१०० रुपये दिले जाणार आहेत, पण त्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. तत्पूर्वी, अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील, असेही बोलले जात आहे. पण, त्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणेबारा लाख लाभार्थी आहेत. नोव्हेंबरपर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसांत लाभ मिळेल.
मुतदवाढीनंतर १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास ६४ हजार अर्जांची तपासणी सुरु असून आणखी केवळ चार हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहे.- प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
संक्रांतीपूर्वी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये?
दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (प्रत्येकी तीन हजार रुपये) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज