मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोना या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावलं उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला आहे . शेती व उद्योग धंद्यावरदेखील मोठे संकट ओढवले आहे. कोरोनाविरोधी लढ्यासाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देऊन नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी सोमनाथ माळी, तलाठी संघटना तालुकाध्यक्ष उमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज