mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2020
in राष्ट्रीय, आरोग्य
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जगभरात चाहूल दिलेली असताना आता एक चांगली बातमी हाती येत आहे. कोरोनाचा कहर असलेल्या अमेरिकेत येत्या 12 डिसेंरला पहिली लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

रविवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार 11 किंवा 12 डिसेंबरपासून कोरोना (Covid-19) लसीकरण सुरु केले जाईल असे म्हटले आहे.

अमेरिकेची औषध निर्माता कंपनी फायझर आणइ जर्मनीची सहकारी कंपनी बायोएनटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज केला होता. यावर एफडीएची 10 डिसेंबरला बैठक होणार आहे.

अमेरिकेचे कोरोना व्हायरस लसीकरणाचे प्रमुख डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी सांगितले की, आमच्या योजनेला मंजुरी मिळाली की 24 तासांच्या आत ही लस लसीकरण करण्याच्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे.

यामुळे मंजुरी मिळाल्याच्या एक किंवा दोन दिवस नंतर ही लस टोचली जाईल.फायझर औषध क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली फायझर बायोएनटेक या जर्मन कंपनीसोबत कोरोनावरील लस तयार करत आहे.

तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे. लसीची चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं किमान एक लक्षण होतं.

फायझरच्या लसीची चाचणी अद्याप संपलेली नाही. मात्र ही लस तिसऱ्या टप्प्यात ९० टक्के यशस्वी ठरल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते.

कोरोनामुळे आतापर्यंत जगात १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानं धोका अधिक वाढला आहे.

कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जगाच्या नजरा वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना, अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) म्हटले आहे, की त्यांची व्हॅक्सीन कमिटी आणीबाणीजन्य परिस्थितीतील वापराच्या मंजूरीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीवर विचार करण्यासाठी 10 डिसेंबरला भेट घेईल.

संघटनेचे प्रमुख स्टेफेन हन म्हणाले, लोकांमध्ये कोरोना लशीप्रति विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चा आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे, असे एफडीएला वाटते.(source:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लस

संबंधित बातम्या

खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बाबो..! स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला; आकडा ऐकून डोकं गरगरेल

June 24, 2025
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मोठी खळबळ! सोलापुरचे डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात मनिषाचा हादरवणारा मेल पोलीसांच्या हाती; आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या

June 18, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

June 12, 2025
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

June 8, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली; ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून केली खतरनाक युक्ती…

June 7, 2025
Next Post

शेतकऱ्याच्या पदवीधर मुलांना उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले : संग्राम देशमुख

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा