mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्याच्या पदवीधर मुलांना उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले : संग्राम देशमुख

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2020
in राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेतकऱ्याच्या पोराला उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले; परंतु अलीकडच्या वर्षभराच्या काळात राज्य सरकारने अनेक महामंडळे बरखास्त करून उद्योजक तरुणांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी धोरणे राबविली, असा आरोप पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी केला.

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने ते बोलत होते. या वेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सोलापूर जिल्हा पदवीधर प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष भोगले, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, स्वप्नील नलवडे, नगरसेवक अजित जगताप, दीपक माने, नागेश डोंगरे, शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, विजय बुरुकूल, हरिदास हिप्परकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आजी – माजी पदाधिकारी, पदवीधर, इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

संग्राम देशमुख पुढे म्हणाले, की शेतकऱ्याच्या पोरांनी उद्योजक बनावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर महामंडळांच्या जोरावर तरुणांनी उद्योग उभा करून बॅंकेकडे कर्ज मागणी केली.

नवीन सरकारने वर्षभरामध्ये या महामंडळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे कर्जदार उद्योजक तरुणाची थकबाकी वाढून अशा तरुणांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी धोरणे वर्षभराच्या काळात या सरकारने राबवली.

पदवीधरांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारणी झाल्यास त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. अलीकडच्या काळात पदवीधर तरुणांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढला असून, त्यासाठी त्यांना जिल्हा स्तरावर वाचनालय व आधुनिक पद्धतीने अभ्यास करून त्यांना चुणूक दाखवता येईल अशा पद्धतीने नियोजन जिल्हा स्तरावर करण्याचा प्रयत्न आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी, ज्या विरोधी उमेदवाराचे वय 73 वर्षे आहे आणि ज्या भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवाराची जन्मतारीख 1973 आहे याची तुलना करताना जो उमेदवार विधान परिषदेच्या पायऱ्या वाघासारखा चढेल अशा उमेदवारांना पदवीधर मतदारसंघातून विजयी करा, असे आवाहन केले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संग्राम देशमुख
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

भगीरथ भालके यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा; अन्यथा त्यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल; अनेक कार्यकर्ते भालकेंची साथ सोडणार?

January 20, 2023
भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

January 18, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

नियुक्तीपत्रे थांबविली! काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी थांबवा, शिंदे-पटोलेंच्या चर्चेनंतरच निर्णय; विश्वासात न घेता निवड केल्याचा होता आरोप

January 16, 2023
आगामी निवडणुका परिचारक-भालके एकत्रित लढणार? आ.आवताडेंना रोखण्यासाठी समविचारी आघाडीची नवी खेळी

आगामी निवडणुका परिचारक-भालके एकत्रित लढणार? आ.आवताडेंना रोखण्यासाठी समविचारी आघाडीची नवी खेळी

January 15, 2023
मुख्यमंत्री उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्दची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : आ.परिचारक

आश्‍चर्याचा धक्का! प्रशांत परिचारक बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त; या मोठ्या निर्णयाचे कारण जाणून घ्या…

January 13, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर आमदार आवताडेसह मंगळवेढ्यातून यांची झाली नियुक्ती

January 10, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

चित्र बदलले! अनेक गावांत उपसरपंच निवडी गंमतीशीर होणार; विजयी झालेला प्रत्येक सदस्य दावा करू शकणार; ‘टाय’ झाले तरच यांना असणार अधिकार

January 5, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

तिढा वाढला! सरपंचाच्या दोन मतांच्या अधिकाराला खंडपीठात आव्हान

January 3, 2023
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

वाद पेटला! मंगळवेढ्यातील काँग्रेसच्या निवडीवरून स्थानिक पदाधिकारी नाराज; प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार अँड.पवारांचा इशारा

January 3, 2023
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा