mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2020
in राष्ट्रीय, आरोग्य
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जगभरात चाहूल दिलेली असताना आता एक चांगली बातमी हाती येत आहे. कोरोनाचा कहर असलेल्या अमेरिकेत येत्या 12 डिसेंरला पहिली लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

रविवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार 11 किंवा 12 डिसेंबरपासून कोरोना (Covid-19) लसीकरण सुरु केले जाईल असे म्हटले आहे.

अमेरिकेची औषध निर्माता कंपनी फायझर आणइ जर्मनीची सहकारी कंपनी बायोएनटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज केला होता. यावर एफडीएची 10 डिसेंबरला बैठक होणार आहे.

अमेरिकेचे कोरोना व्हायरस लसीकरणाचे प्रमुख डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी सांगितले की, आमच्या योजनेला मंजुरी मिळाली की 24 तासांच्या आत ही लस लसीकरण करण्याच्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे.

यामुळे मंजुरी मिळाल्याच्या एक किंवा दोन दिवस नंतर ही लस टोचली जाईल.फायझर औषध क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली फायझर बायोएनटेक या जर्मन कंपनीसोबत कोरोनावरील लस तयार करत आहे.

तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे. लसीची चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं किमान एक लक्षण होतं.

फायझरच्या लसीची चाचणी अद्याप संपलेली नाही. मात्र ही लस तिसऱ्या टप्प्यात ९० टक्के यशस्वी ठरल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते.

कोरोनामुळे आतापर्यंत जगात १२ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानं धोका अधिक वाढला आहे.

कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जगाच्या नजरा वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना, अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) म्हटले आहे, की त्यांची व्हॅक्सीन कमिटी आणीबाणीजन्य परिस्थितीतील वापराच्या मंजूरीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीवर विचार करण्यासाठी 10 डिसेंबरला भेट घेईल.

संघटनेचे प्रमुख स्टेफेन हन म्हणाले, लोकांमध्ये कोरोना लशीप्रति विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चा आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे, असे एफडीएला वाटते.(source:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लस

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसमधून निघालेल्या विवाहित महिलेस दारुचे नशेत पाठीमागून केस ओढून हाताने लाथाबुक्याने केली मारहाण; नेमके कारण काय?

November 22, 2025
धक्कादायक! पिसाळलेला कुत्रा चावल्याने मंगळवेढ्यातील वृद्ध इसमाचा मृत्यू; काळजी घेण्याचे केले आवाहन

दिलासा! भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ‘एवढ्या’ लाखांची भरपाई; सरकारचा मोठा निर्णय

November 22, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

धक्कादायक! मंगळवेढ्यातील सुपुत्र वीर जवान कर्तव्य बजावत असताना शहिद; उद्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार

November 19, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

तेजस्वी यादव लढले पण करिश्मा मोदी-नितीश कुमारांचाच; NDA च्या विजयाची 15 कारणे, महागठबंधन का हरले?; पराभवाची 15 कारणे

November 15, 2025
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा

November 11, 2025
शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

चक दे इंडिया! भारतीय पोरींनी मैदान मारलं, ICC वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरलं; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले

November 3, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; ‘या’ कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

November 1, 2025
शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; फायनलमध्ये आता ‘या’ देशाशी होणार लढत

October 31, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 29, 2025
Next Post

शेतकऱ्याच्या पदवीधर मुलांना उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले : संग्राम देशमुख

ताज्या बातम्या

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ज्या टप्प्यावर आता प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढच्या टप्प्याची निवडणूक प्रकिया राबवली जाणार; मंगळवेढा नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने नाही

November 30, 2025
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका निवडणूक नव्याने जाहीर; असा आहे सुधारित वेळापत्रक; उमेदवारांची धाकधूक वाढली

November 30, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

‘मंगळवेढा टाईम्स’चे वृत्त तंतोतंत खरं! मंगळवेढा पालिकेची निवडणूक लांबणीवरच; २० डिसेंबरला होणार मतदान; आयोगाचा अधिकृत आदेश जारी; निवडणूक का पुढे गेली? नेमके कारण आले समोर

November 29, 2025
घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

November 29, 2025
लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

November 29, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता; १५ जिल्ह्यांमध्ये निवडणुका प्रथम; सुप्रीम कोर्टाने निवडणुकांना स्थगिती न देता ५० टक्के आरक्षणाची अट कायम ठेवली

November 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा