टीम मंगळवेढा टाईम्स ।
बदलापूरच्या घटनेने समाजमन हेलावून गेलं आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातील लहान मुली देखील सुरक्षित नाही. महाराष्ट्रातील घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.
प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे. परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले. सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळालीय.
मला या घटनेत राजकारण करायचं नाही. मात्र, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळ लावण्यात येत आहे.
त्याचा आम्ही निषेध करतो. या गंभीर प्रश्नावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा केली आणि येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – नाना पटोले
महायुतीतील एका पदाधिकाऱ्यांनी एका महिला पत्रकारासोबत अतिशय विकृत शब्दात या घटनेवर भाष्य केलंय. ही घटना निषेधार्थ असून त्यांना या घटनेशी काहीही देणंघेणं नसल्याचे यातून दिसून आले आहे. या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत.
या आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. सध्या घडीला महाराष्ट्रात जे अकार्यक्षम सरकार आहे,
त्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न नागरिक करतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केला. आज मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर नाना पटोले यांनी ही घोषणा केली आहे.(स्रोत:ABP माझा)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज