मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथे दुबईहून परतलेला एक कोरोना संशयीत रुग्ण आढळून आल्याची चर्चा सुरू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.दरम्यान,आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासनाने वेळेत सतर्कता दाखवून त्या रुग्णाची खातरजमा केल्यानंतर तो संशयीत रूग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वानीच सूटकेचा निःश्वास टाकला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जालिहाळ येथील एक इसम चार दिवसापुर्वी दुबई येथून गावी आला होता.येताना तो कोरोना संशयित वाटल्याने विमानतळावर त्याची तपासणी करून चौदा दिवस होम कोरोंटाईन म्हणून त्याला सोडण्यात आले. तसा शिक्काही त्याच्या हातावर मारण्यात आला होता.बुधवार दि.१८ रोजी दबईहून आलेला हा रुग्ण गुरुवार.१९ रोजी भारतात परतला व तो त्याच्या मूळ गावी जालिहाळ येथे आल्यानंतर त्याला त्याच्या घरी एका खोलीत ठेवण्यात आले.
मंगळवेढयात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही
मंगळवेढा शहर व तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त नाही.तरी लोकांनी घाबरून जावू नये,जर कोणी संशयित आढळून आल्यास त्यांनी आरोग्य व पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा,त्या राग्णाची खातरजमा करून योग्य ते उपचार आरोग्य विभाग करेल.लोकांनी काळजी घ्यावी,अफवांवर विश्वास ठेवू नये,जमावबंदी लागू असल्याने एकत्र येवू नये, गर्दी करू नये तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. -जोतीराम गुंजवटे,पोलिस निरिक्षक,मंगळवेढा.
दरम्यानच्या काळात जालिहाळ येथे एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला असून तेथील लोकांनी त्याला कोंडून ठेवण्यात आल्याची अफवा पसरविल्यानंतर बाब उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना खातरजमा करण्याचे आदेश दिले असता मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक जोतीराम गंजवटे,नंदेश्वर बीटचे हवालदार शहानूर फकिर,चालक हवालदार मनोज कुंभार,पो.ना गजानन पाटील,पो.कॉ.नागनाथ डबरे आदींचे पथक जालिहाळ येथे तातडीने दाखल झाले.व पोलिस निरिक्षक गुंजवटे यांनी त्या संबंधित व्यक्तीशी चर्चा करून खोकला,सर्दी तसेच काही त्रास आहे काय अशी विचारपूस केली असता तो संशयित रूग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचे समजले.
तसेच तो सध्या १४ दिवसाच्या होम कोरोंटाईनवर असून त्याला एका वेगळया खोलीत ठेवण्यात आल्याचा प्रकारही समोर आला.आरोग्य विभाग व आशा वर्कर यांनीही या ठिकाणी भेटी देवून त्या रूग्णाची खातरजमा केली आहे.तो रुग्ण जरी कोरोना निगेटिव्ह असला तरी अचानक पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांनी याचा चांगलाच धसका घेतला असून लोकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक गुंजवटे यांनी केले आहे.
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज