टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील पाटखळ या गावांमध्ये जागतिक चिमणी दिनानिमित्त दि.२० मार्च रोजी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पक्षाच्या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. पाटखळ व परिसरात विविध पक्षी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात. या पक्ष्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये म्हणून पाणपोईची संकल्पना राबवली असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भीमराव मोरे यांनी सांगितले. करण्यात आले.
या पाणपोईचे उद्घाटन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या हस्ते व पाटखळचे सरपंच ऋतुराज बिले, दामाजी कारखान्याचे संचालक महादेव लुगडे यांचे प्रमुख उपस्थितीत
यावेळी भिमराव मोरे म्हणाले, जागतिक चिमणी दिन २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा,
विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे.
यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय. या निमित्तानेच आज उन्हाळ्यात चिमण्यांच्या संरक्षणासाठी मंगळवेढा पत्रकार संघाच्या वतीने पक्षांच्या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले असल्याचेही शेवटी मोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद बिनवडे, समाधान फुगारे, ज्ञानेश्वर भगरे, औदुंबर ढावरे यांच्यासह लक्ष्मण नागणे, सचिन हेंबाडे, संतोष मिसाळ, दत्तात्रय कांबळे, म्हाळाप्पा शिंदे, सुनिल कसबे, बालाजी टुले, प्रसाद कसबे, दिगंबर गरंडे,
रविराज खिलारे, सौरभ कांबळे, दामाजी नगर ग्रा.पं.चे सदस्य विशाल जाधव, खुपसंगीचे ग्रा.प. सदस्य सचिन जगदाळे, जेष्ठ नागरिक बाबुराव जाधव, महादेव आवताडे, ज्योतीराम आवताडे, राजाराम डांगे, भारत ताड, सिताराम ताड, कांता कोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज