mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारकीचा अद्याप निर्णय नाहीच;मात्र सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारकीचा अद्याप निर्णय नाहीच;मात्र सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने दुस-यांदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे.मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणाची माहिती देत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

यामध्ये मध्यस्थी केली नाही,तर मला राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला असल्याची चर्चा आहे.तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची आणि त्यांचे अभिनंदन करणा-या पोस्ट काल दिवसभर समाज माध्यमातून फिरत होत्या.राज्यात कोरोनाचे संकट असतानाच आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचे सावट निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्त करावी असा प्रस्ताव दुस-यांदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर करण्यात आला आहे.

मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दुरध्नवीवरून संपर्क साधला.या मुद्यावरून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून,यामध्ये मध्यस्थी केली नाही,तर मला राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला असल्याची चर्चा आहे.या मध्ये आपण लक्ष घालू असे आश्वासन पंतप्रधान यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले असल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीवर राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचा सुर आहे. मात्र दुसरीकडे समाज माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीबद्दल त्यांच्यावर अभिमंदनाचा वर्षाव सुरू होता.फेसबुक, ट्विटर आदी समाज माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे अभिमंदन करण्यात येत होते.

काल दिवसभर सुरू असलेल्या अभिनंदनाच्या शुभेच्छामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.काही ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो शेअर करून अभिनंदन करण्यात येत होते. हा अभिनंदनाचा वर्षाव रात्री उशीरापर्यंत सुरू होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना येत्या २७ मेपर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे विधानपरिषदेच्या निवडणूका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.सध्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करावी अशी शिफारस दुस-यांदा करूनही राज्यपालांनी त्यावर कोणताच निर्णय न घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना फोन केला असल्याचे समजते.(मुंबई नगरी)

———————–

ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Breaking : सोलापुरात करोनाने पार केली शंभरी ; तब्बल 21 रुग्ण एकाच दिवसात

Breaking : सोलापुरात करोनाने पार केली शंभरी ; तब्बल 21 रुग्ण एकाच दिवसात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा