टीम मंगळवेढा टाईम्स।
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले. ही बाब सरपंचाच्या जिव्हारी लागली आणि सरपंचाने चक्क वीज कर्मचाऱ्याला गावातील वीज खांबाला बांधले. एवढेच नाही तर अश्लील शिवीगाळ तसेच मारण्याची धमकी दिली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा येथे घडली.
याप्रकरणी वीज कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून सरपंच किरण बांदूरकर यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सरपंच फरार आहे.
चार वर्षांपासून वीज कर्मचारी सूरज परचाके हे नकोडा व उसगाव येथे लाइनमन म्हणून कार्यरत आहे. गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याबरोबर अनेक तक्रारी आहेत.
शनिवारी दुपारी वीज कर्मचारी परचाके उसगावला जात असताना नकोडा येथील सरपंच किरण बांदूरकर तसेच अन्य दोघांनी रस्त्यात अडवून त्यांना नकोडा येथे आणले.
त्यानंतर एका खांबाला बांधून शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. माहिती मिळताच स्थानिक वितरण कार्यालयातील अभियंता नयन भटारकर हे कर्मचाऱ्यांसह गावात पोहोचले. त्यानंतर सरपंचाविरोधात घुग्घुस पोलिसात तक्रार दाखल केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज