मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जत तालुक्यातील उमदी येथे पोटच्या मुलानेच आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
–मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात भाजपचे मिशन लॉटस लवकरच ‘या’ नेत्याचे भाकीत
याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलानेच आपल्या वृद्ध आईवडिलांची आणि बहिणीची हत्या केल्याने सांगली जिल्हा हादरला आहे.
या घटनेचे वृत्त ऐकून सारेच सून्न झाले आहेत. गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (८२), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (७५) आणि समुद्राबाई बिरादार (६२) अशी मृतांची नावे आहेत. संशयित आरोपी सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (५८) याने हे तिहेरी हत्याकांड केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
-सोलापुरातील ‘या बँकांचे’ 12 कोटी ‘येस बँकेत’ अडकले!
जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळी उमदी आणि जत पोलीस दाखल झाले आहेत. आज सकाळी हा हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी तसेच नातेवाईकही दाखल झाले असून काहीसे तणावाचे वातावरण आहे.
-सोलापूर जिल्हा परिषदेची बजेट सभा लांबणीवर
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज