mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऊस गाळप हंगामाबाबत मोठी अपडेट! राज्यातील साखर कारखाने कधी सुरु होणार? शिंदे सरकारचं ठरलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 20, 2023
in राज्य
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या ‘चिमणी’वर आज हातोडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त; 200 हून अधिक सभासदांना घेतलं ताब्यात

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.

यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले.गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून १०५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन ८८.५८ लाख मेट्रीक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम २०२२-२३ मध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश राज्याचा क्रमांक आहे.

ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला.

या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एफआरपी बाबात समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यंदा उसाला दर किती मिळणार?

राज्यात यंदा उसाचं क्षेत्र घटलेलं आहे. परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. तो देखील शेतकरी संघटनांमुळं मागं घेण्यात आला. त्यामुळं राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा किती दर मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: साखर कारखाने

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Next Post
गुणरत्न सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करा, मंगळवेढा सकल मराठा समाजाची मागणी; काय आहे प्रकरण?

गुणरत्न सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करा, मंगळवेढा सकल मराठा समाजाची मागणी; काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा