मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शनिवार दि.२९ मार्च रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्र्यांचा अचानक दौरा निश्चित झाला असून
यावेळी ते मुख्यत्वे मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी करतील, तसेच पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात माहिती घेतील,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. काल शुक्रवारी दुपारी अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमध्ये येऊन प्रशासनाची बैठक घेतली.
तातडीने पोलिस बंदोबस्त ही मागवण्यात आलेला आहे. फडणवीस हे सकाळी मुंबईहून विमानाने सव्वा दहा वाजता सोलापूरला येतील, तिथून हेलिकॉप्टर ने तुळजापूरला जातील, दुपारी बारा वाजता ते हेलिकॉप्टरने पंढरपूरला येथील,
श्री विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर १ वाजू ५० मिनिटांपर्यंत त्यांचा विठ्ठल मंदिरात राखीव वेळ आहे. त्यानंतर दोन वाजता ते हेलिकॉप्टरने नीरा नरसिंहपूरकडे रवाना होतील.
या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामाची पाहणी करतील तसेच पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात प्रशासनाकडून माहिती घेतील, काही सूचना करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
येत्या आषाढी यात्रेच्या वेळी कॉरिडॉरचे भूमिपूजन करण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने कॉरिडॉर पुढे नेण्यासाठी आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री आढावा घेतील.
मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट
विठ्ठल मंदिर परिसरात राबवण्यात येणाऱ्या काॅरिडाॅर संदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत.
परिचारक यांचे वडिल प्रभाकर परिचारक यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे माजी आमदार परिचारक यांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे परिचारक वाड्यावर जाणार असल्याची माहिती आहे.
प्रशांत परिचारक यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे कुलदैवत नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, त्यानंतर फडणवीस हे इंदापूरमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे अधिवशेन संपल्यानंतर तातडीने होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज