मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व व वारी परिवार यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंगळवेढा-पंढरपुर हरित वारी पालखी महामार्गावरील लावण्यात आलेल्या वृक्षांचा चौथा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.
५ जून २०१९ रोजी वृक्षप्रेमी संतसेवक हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या संकल्पनेतून सदर हरित वारी पालखी महामार्गवर वृलागवडीचा शुभारंभ करण्यात आला होता
सध्य परिस्थितीत तरूणांनी एखाद्या ढाब्यावर जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा झाडे लावून झाडांबरोबर वाढदिवस साजरा करावा ही आदर्श संकल्पना वारी परिवाराने जपलेली आहे
सुरुवातीस पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,अजित जगताप, दिगंबर भगरे यांच्या हस्ते झाडांचे पूजन करून, खत टाकून केक कापण्यात आला.
यावेळी झाडांना लावण्यात आलेले रंगीबेरंगी फुगे, रांगोळी लक्ष वेधून घेत होते.तसेच आपण आपल्या वाढदिवसाला केक कापून जसे खातो त्याप्रमाणे वृक्षांच्या वाढदिवसाला झाडांचे खाद्य म्हणून सेंद्रिय खताचा केक कापून अनोख्या पद्धतीने
वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्षारोपणच नव्हे, तर वृक्षसंवर्धन ही आपली जबाबदारी आहे हे आळखून प्रत्येक नागरिकाने वृक्षरोपनाबरोबरच वृक्षसंवर्धनाकरिता पुढाकार घेण्याची गरज निर्माण व्हावी यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो.
आगवेगळ्या वृक्षांच्या वाढदिवसाला अमर जाधव,भरत राजपुरोहित,मारुती जाधव,यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी वृक्षप्रेमी मोहनराव जुंदळे,दत्तात्रय भोसले,सत्यजित सुरवसे,माणिक गुंगे,विठ्ठल बिले,परमेश्वर पाटील,अरुण गुंगे,
स्वप्नील टेकाळे,सुदर्शन ढगे,सुरेश माळी,रवी जाधव,राजेंद्र गणेशकर,विनायक सोमदळे,लल्लू जठार,नाना भगरे,जमीर इनामदार, दिलीप अडसूळ, अरुण गुंगे,मश्चिंद्र नागणे,
स्वप्निल फुगारे, तेजस गणपाटील सतिश दत्तू यांचेसह दामाजी चालक- मालक मोटर संघटना व वारी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज