मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर येथील लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेळगी (मित्रनगर) शाखेच्या कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकारी व कर्जदाराविरुद्ध पाच कोटींची फसवणूक केल्याची
फिर्याद जामीनदार विकास वीरय्या गुत्तेदार (रा. लॅण्डमार्क सिव्हिल लाइन, सोलापूर) यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे.
१२ फेब्रुवारी २०१६ ते ३० मार्च २०१७ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्जदार कुलभूषण वासुदेव गुत्तेदार आणि बँकेचे अधिकारी यांचा गुन्हा नोंदलेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिस सूत्रांनुसार, लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शेळगी (मित्र नगर) शाखेचे कर्ज मंजूर करणारे अधिकारी व कर्जदार कुलभूषण वासुदेव उपलप यांनी नमूद कालावधीत १ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
व्याजासह ती रक्कम पाच कोटींवर पोहोचली आहे. त्या दोघांसह सोसायटीचे संचालकांनी आपल्यासह सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याचे फिर्यादी विकास गुत्तेदार (रा. लॅण्डमार्क सिव्हिल लाइन, सोलापूर) यांचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी कुलभूषण उपलप व संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मिळून सोसायटीतून १२ फेब्रुवारी २०१६ रोजी १ कोटी ९५ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. ३० मार्च २०१७ ला या कर्जाची मुदत संपली. ती रक्कम आता व्याजासह ५ कोटी ४ लाख २९ हजार ९९० रुपये झाली आहे.
कर्जासाठी जामीनदार असलेल्यांना जबाबदार धरून सोसायटीने त्यांना लेखी नोटिसा दिल्या आहेत. मात्र कर्ज घेताना जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी जामीनदाराच्या समक्ष होणे अपेक्षित होते.
मात्र, सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी तसे झाले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार मोहन पवार करीत आहेत.
कल्पना न देता मंजूर केले कर्ज
फिर्यादीस कोणतीही कल्पना न देता त्यांनी कर्जदार कुलभूषण उपलप यांना सोसायटीने कर्ज मंजूर केले. त्यात सोसायटीच्या संचालक मंडळासह संबंधित अधिकारी व कर्जदाराने आपली आणि सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज