टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीचे सदस्य सतिश नामदेव भोसले यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मंगळवेढा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधिश श्रीमती गंगवाल-शहा यांनी निर्णय दिला.
यातील सविस्तर वृत्त असे, भोसे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक सन २०२०-२१ मध्ये जाहीर झाली होती. सदर निवडणुकीमध्ये प्रभाग कं. ५ मध्ये विजय आनंद लोहार, सतिश नामदेव भोसले यांनी सर्वसाधारण या जागेकरीता अर्ज भरला होता.
सदर निवडणुकीत विमल भारत लोहार यांनी विजय आनंद लोहार हे ग्रामपंचायतीचे ठेकेदार आहेत असा बनावट स्वरुपाचा दाखला घेवून विजय आनंद लोहार यांचे अर्जावर हरकत घेतली होती व सोबत ग्रामपंचायतीचे ठेकेदार आहेत असा बनावट व खोटा दाखला तयार करुन दाखल करण्यात आला.
परंतू महाराष्ट्र शासन ग्रामविभाग, शासन निर्णय कं. आर.टी.एस.२०१८ प्र.कं १४५/ आस्था. ५ दि. १३ फेब्रुवारी २०१९ या परीपत्रकाव्दारे दाखला देणे बंद केलेले आहे,
याची माहिती व जाणीव असताना देखील तसेच अर्जदाराने स्वतःचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत दाखल केलेले असताना देखील तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकारी श्री. खेताडे यांनी विजय लोहार यांचा अर्ज अवैध ठरविलेला होता.
ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सदर बनावट दाखले केल्यामुळे निवडणुक अर्ज अवैध ठरविल्याचे प्रकरण संपुर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला होता.
त्यानंतर विजय लोहार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याबाबत आदेश केला होता, तसेच प्रभारी ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले यांनी आपण सदरचे दाखला दिले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला होता,
त्यामुळे इंगोले यांच्या स्वाक्षरीचे बोगस दाखले दाखल केलेल्या उमेव्दारावर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश करण्यात आला होता. पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी काकडे यांनी आपला भाचा बिनविरोध निवडून आणण्यासाठी राजकीय ताकीदीचा गैरवापर केला होता.
सदर कामी विजय लोहार यांनी दिवाणी न्यायालय, मंगळवेढा येथे भोसे ग्रामपंचायत अर्जदाराचे नामनिर्देशनपत्र नामंजूर केल्याचा निर्णय रद्द करणेबाबत याचीका दाखल केली होती. सदर याचीकेवर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणी दरम्यान विजय लोहार हे ठेकेदार असल्याबाबत कोणतीही कागदपत्रे न्यायालयासमोर हजर करण्यात आली नाहीत तसेच सदर कामी दोन्ही बाजुकडील तसेच विद्यमान ग्रामसेवकांच्या साक्ष नोंदविण्यात आली.
सदर सुनावणी दरम्यान विमल लोहार यांनी हरकत अर्जासोबत बनावट व बोगस दाखले दिल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधिश श्रीमती गंगवाल-शहा यांनी सदर प्रकरणी भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील निवडणुक निर्णय अधिकारी यांचा आदेश अयोग्य असल्याचे जाहीर करुन सतिश नामदेव भोसले यांची ग्रामपंचायत पदी झालेली निवड रद्द करणेचा आदेश केला आहे.
सदर निकालामुळे यापुढील काळात ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान चुकीचे व बनावट दाखले तयार करुन ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवू पाहणाऱ्या पुढाऱ्यांना देखील चाप बसणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज