टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार दिगंबर कोष्टी हे आज वयोमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आज दि.31 मे रोजी दुपारी 4 वाजता सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते,
अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांना वैयक्तिक अनेक पुरस्कार देऊन गौरव आले आहेत.
लक्ष्मी दहिवडीचे सुपुत्र व जिल्हा परिषद बांधकाम विभाग मंगळवेढा येथील शाखा अभियंता नंदकुमार कोष्टी हे आज वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
नंदकुमार कोष्टी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांची जिल्हा परिषदेकडे 33 वर्षे सेवा झाली असून त्यांनी केलेल्या योग्य कामाची पावती त्यांना अनेक पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे.
नंदकुमार कोष्टी एक कर्तव्यतत्पर अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. अत्यंत चांगली व नियोजनबध्द कामगिरी करत या विभागाची शान राखली आहे. जातीनीशी प्रसंगी रात्री अपरात्री काम करून महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि कर्तव्य भावनेतुन काम करणारे अभियंता अशी त्यांची प्रतिमा आहे.
त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे त्यांनी या भागातील जनतेतही आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या चांगल्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना आदर्श अभियंता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
आज होणाऱ्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास सर्वानी उपस्थित राहावे असे आव्हान नंदकुमार कोष्टी यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज