मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर ते गोव्यासाठी फ्लाय ९१ या विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली असून, पुढील पंधरा दिवसांत तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच सोलापूर ते मुंबईसाठी स्टार एअर कंपनीने तयारी दर्शवली असून, कंपनीच्या एका अटीमुळे मुंबईसाठी विमानसेवा १ ते २ वर्षासाठी लांबू शकते.
सोलापूर विमानतळाला ‘कॅट थ्री सी’ ची मान्यता हवी आहे, तशी मागणी स्टार एअर कंपनीने डीजीसीएकडे केली आहे. या कंपनीकडे असलेली विमाने ‘कॅट ३ सी’ विमानतळावर उतरणारी आहेत. विशेष म्हणजे, सोलापूर विमानतळाला सध्या ‘कॅट २ सी’ ची मान्यता आहे.
विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मुंबईत बैठक झाली असून, या बैठकीत लवकरात लवकर विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. स्टार एअरने केलेल्या मागणीमुळे अधिकारीदेखील परेशान झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळाला कॅट ३ सीची मान्यता मिळणे खूप अवघड आहे. त्यासाठी विमानतळाची काही प्रमाणात रचना बदलावी लागेल. तसेच अत्याधुनिक अशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
विमानतळाच्या भिंतीला लागूनच नागरी वसाहत आहे. तसेच विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. या सर्व अडचणींमुळे कॅट ३ सीची मान्यता मिळविण्यासाठी खूप वेळ जाणार आहे.
कॅट ३ सी म्हणजे काय?
कॅट ३ सी ही सर्वांत प्रगत श्रेणीत मोडणारी विमानसेवा आहे. ही मान्यता म्हणजे इन्स्ट्रुमेंट लैंडिंग सिस्टम (आयएलएस) पद्धत आहे. जी शून्य दृश्यमानतेच्या परिस्थितीत लैंडिंगला अनुमती देते. हे ‘कॅट थ्री बी’ ला मागे टाकते. जे मर्यादित दृश्यमानतेसह लैंडिंगला परवानगी देते. तसेच काही प्रकरणांमध्ये स्वयंचलित टॅक्सिंगची क्षमता देते.
कॅट २ सी म्हणजे
‘कॅट २ सी’ म्हणजे दुसऱ्या श्रेणीत मोडणारी विमानतळ. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) ने सुसज्ज विमानतळ. ही प्रणाली कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही अचूक दृष्टिकोन आणि लँडिंग करण्यास अनुमती देते. परंतु निर्णयाची उंची ६० मीटर (२०० फूट) पेक्षा कमी नसावी. तसेच धावपट्टीची दृश्यमान श्रेणी ३५० मीटरपेक्षा कमी नसावी.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज