टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील दोन मटका अड्डयांवर मंगळवेढा पोलिसांनी अचानक छापा टाकून 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी व बुकी मालक सिध्दू सलगर हा अद्याप फरारच असून त्यास पोलिसांनी लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
बुकीमालकास लवकरच अटक करणार
मरवडे येथील मटका आड्यावर छापा प्रकरणातील आरोपी बुकी मालक सिध्दू सलगर याला लवकरच अटक करण्यात येईल असे तपास अधिकारी हवालदार विनोद घोळसगावकर यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,मरवडे येथे मटका सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापूसाहेब पवार,गजानन पाटील,सचिन बनकर आदींचे पोलिस पथक 27 मे रोजी मरवडेत दाखल झाले. त्यावेळेस सकाळी 11.30 वा. अशोक रामचंद्र पडवळे (वय 50 रा.मरवडे ) हा सिध्दू सलगर (रा.शरदनगर) याच्या सांगण्यावरून मरवडे गावातील एस.टी.स्टँडच्या पाठीमागील रोडवर शाळेसमोर रोडवरून येणार्या जाणार्या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेताना त्यास पकडले.व त्याचेकडून रोख रक्कम 230 व मटक्याचे साहित्य जप्त होते.
तसेच दुपारी 12.00 वा.आनंदा सुभाष घुले(वय 44 रा.मरवडे) हा सिध्दू सलगर (रा.शरद नगर)याच्या सांगण्यावरून मरवडे गावात डोणज रोडवरून येणार्या जाणार्या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेत असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.व त्याचेकडून रोख रक्कम,बजाज डिस्कव्हर दुचाकी व मटक्याचे साहित्य असा एकूण 15 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अशोक पडवळे,आनंदा घुले व सिध्दू सलगर या तिघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असलातरी मुख्य आरोपी व बुकी मालक सिध्दू सलगर फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
Bookie owner Sidhu Salgar absconding in Matka Aadya raid case
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज