mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अनैतिक संबंधातून पतीचा खून;पत्नी,प्रियकरासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अनैतिक संबंधातून पतीचा खून;पत्नी,प्रियकरासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याच्या कारणावरून  संतोष ज्ञानेश्‍वर शिंदे( वय 38 रा.सरकोली) याचे मंगळवेढा बसस्थानकावरून अपहरण करून त्याला जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने  कर्नाटकातील कल्लूकनीयाली येथील दगडाच्या खाणीत फेकून दिल्याप्रकरणी तानाजी बळीराम भोसले,दादा उर्फ ऋषिकेश नवनाथ गायकवाड रा.अंाबे,तानाजी दांडगे,रा.रांझणी,सागर महादेव दांडगे रा.चळे व मयताची पत्नी अनिता संतोष शिंदे रा.सरकोली या पाच जणांविरूध्द अपहरण करून खून करणे व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.




या घटनेची हकिकत अशी की,यातील मयत संतोष ज्ञानेश्‍वर शिंदे हा मुळचा सरकोली येथील असून तो दि.29 जुलै रोजी हिवरगाव ता. मंगळवेढा येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आला होता. अंत्यविधी उरकल्यानंतर दुपारी त्याचे नातेवाईक संजय नागणे यांनी त्याला मोटरसायकलवरून मंगळवेढा बसस्थानकावर सोडले होते. तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. म्हणून छगन नागणे याने पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांनी बसस्थानकावरील सी.सी. फुटेज तपासले असता संतोष यास चार इसम चालत घेवून जात असल्याचे दिसून आले. यामधील दोन इसमांची ओळख पटली यामध्ये आंबे गावातील तानाजी भोसले व दादा उर्फ ऋषिकेश गायकवाड हे असल्याचे मयताच्या नातेवाईकांनी ओळखले.तानाजी भोसले याचे मयत संतोष शिंदे यांची पत्नी अनिता हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 


वरील दोघांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासल्यानंतर हे बेपत्ता असल्याचे लोकेशनवरून निष्पन्न झाले.सदर प्राप्त नंबरवरून वेळोवेळी ते संपर्कात आल्याचेही उघड झाले. मयत संतोष शिंदे यास मंगळवेढा येथील बसस्थानकावरून चार चाकी वाहनातून त्याचे अपहरण करून जीवे ठार मारून त्याचे प्रेत विजापूर येथील दगडाचे खाणीमध्ये टाकून दिले होते. विजापूर पोलिसांनी हा मृतदेह  अज्ञात  म्हणून फ्रिजमध्ये राखून ठेवले होते. सदर मयताचे फोटो नातेवाईकांनी पाहिले  असता तोच संतोष शिंदे असल्याची खात्री पटली.दरम्यान पोलिसांनी मयताची पत्नी हिस अधिक तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

———–



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सांगलीकरांच्या मदतीसाठी धावले मंगळवेढेकर !

सांगलीकरांच्या मदतीसाठी धावले मंगळवेढेकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा