mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते मोहिमेचा शुभारंभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized


(मंगळवेढा : समाधान फुगारे)

मंगळवेढा तालुक्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते काढणे या मोहिमेचा शुभारंभ ग्रामपंचायत मारापुर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, उपविभागीय डाक निरीक्षक सोमनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मा.सरपंच विनायक यादव ,माजी सदस्य विक्रम यादव,पोलीस पाटील संजय पाटील,बाबुराव माने,शिक्षक,ग्रामस्थ,आरोग्य कर्मचारी, आशा,गतप्रवर्तक आदि उपस्थित होते.

 आरोग्य विभाग पंचायत समिती मंगळवेढा व डाक विभाग मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम दिनांक पाच-सहा व दहा तारखेला राबवली जात असून दररोज सुमारे पंचेचाळीस ते पन्नास गावे, उपकेंद्रात तसेच उर्वरित लाभार्थ्यांना दिनांक दहा रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी या मोहिमेचा लाभ घेता येणार आहे.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नंदकुमार शिंदे यांनी आरोग्य विभागामार्फत शासनाच्या जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, कुटुंब कल्याण योजना, आयुष्यमान भारत योजना,क्षयरुग्णांसाठी पोषण आहार भत्ता आदी योजनांचे लाभ लाभार्थ्याला थेट खात्यावर जमा होणार असून बँक खाते नसल्यामुळे कोणताही लाभार्थी मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहणार नसल्याचे सांगितले. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावातील राजकीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते ,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉक्टर नंदकुमार शिंदे यांनी केले.

उपविभागीय डाक निरीक्षक सोमनाथ गायकवाड यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते हे आधार लिंकड, पेपरलेस,डिजिटल पासबुक,एसएमएस, एनईएफटी -आरटीजीएस या मोफत सुविधा, इतर बँकेतील पैसे पोस्ट ऑफिस मधून काढता येणे,IPPB ॲप द्वारे ऑनलाईन सुविधा आदि फायदे नमूद करून हे खाते डिजिटल युगाची सुरुवात असल्याचे सांगितले.

या मोहिमेनंतर लाभार्थ्यांच्या सोयीकरिता पोस्ट विभागाच्या सहकार्याने नवीन आधार कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर नंदकुमार शिंदे यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विठ्ठल कारखान्याचे कामगार लढणार कायदेशीर लढा

विठ्ठल कारखान्याचे कामगार लढणार कायदेशीर लढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

May 4, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा