मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
एकसंघ राहून मतदार संघाचा विकास करू या असे मत संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले . पुणे येथील समीर लॉन्समध्ये मंगळवेढयातील पुणे येथे कार्यरत असणारे कामगार , उद्योजक , विविध आस्थापनातील अधिकारी यांनी मंगळवेढा तालुका रहिवासी संघाच्या स्थापना केली असून त्याच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून आवताडे बोलत होते.
आवताडे म्हणाले , जर द्राक्षे सुटी असतील तर त्याचे मोल होत नाही , ती जर घडात असतील तर त्याचे मुल्य वाढते त्याचप्रमाणे आपण संघटन वाढवून एकत्रीत राहून व्यक्तिगत त्याबरोबर समाजाचा विकास करू या . आपण सर्वजण या बहुआयामी शहरात एकत्रीत आलात ही आनंदाची गोष्ट आहे . यापुढे मंगळवेढा तालुका रहिवासी संघास सर्वतोपरी मदत करू . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत सरकारचे अन्न महाम डळाचे सल्लागार पोपट हजारे होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आझाद दारूवाले यांनी केले . त्यांनी यावेळी रहिवासी संघाची उद्दिष्टे सांगितली . कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपट हजारे , महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा अनिता नागणे , रहिवासी संघाचे अध्यक्ष सुखदेव चव्हाण , बाळासाहेब होवाळ यांची समयोचित भाषणे झाली या कार्यक्रमास पुणे , पिंपरी चिंचवड परिसरातील पुणे येथे रहिवासी असणारे विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक सहकुटुंब उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश माने , जमीर मकानदार , जयवंत चव्हाण , रोहिदास मेटकरी , शिवाजी पवार , बंडू शिंदे , बसवराज पाटील , अशोक बिराजदार , नंदकुमार स्वामी , फारूक शेख , कल्याण आवताडे , विकास साखरे , पोपट ढेकळे , बापू ननवरे , अरूण भोसले , दामाजी आसबे , नागेश चव्हाण , रामा डांगे , देवराज पवार , मल्लिकार्जुन पाटील , रणजित शिंदे आदीनी परिश्रम घेतले .
या कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणीय होती . कार्यक्रमचे सुत्रचालन समीर कुलकर्णी व ज्यु . मकरंद अनासपुरे यांनी केले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज