मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गतिमंद मुलांच्या स्कूल बसमध्ये घुसून एका अल्पवयीन गतिमंद मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध शनिवारी (ता. 18) सातारा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकारात स्कूलबसचा चालकच सहभागी असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या टोळक्याकडून मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सर्रास सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष मुलांच्या शाळेच्या स्कूल बसमध्ये घुसून दोन युवक एका आठवर्षीय मुलीला मारहाण आणि नको तिथे स्पर्श करीत होते. एवढेच नाही या प्रकाराचे चित्रीकरण करून ते व्हायरलही करीत होते. काही दिवसांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू होता.
विशेष म्हणजे यात स्कूलबसचा चालकही त्यांना मदत करीत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुख्याध्यापिकेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी स्कूलबसचा चालक अविनाश शेजूळ व अन्य दोन अल्पवयीन साथीदार अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. गुंडांचे हे टोळके शाळेतील अन्य मुलांनाही मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज