mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढात महिलांसाठी नवकिरण महिला प्रतिष्ठान हे एक संजीवनी: सौ.रतन थोरवत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढात महिलांसाठी नवकिरण महिला प्रतिष्ठान हे एक संजीवनी: सौ.रतन थोरवत

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



मंगळवेढा येथील नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी “सशक्त महिला सबलीकरण” या विषयावर लक्ष्मीनारायण मंगलकार्यालय, मंगळवेढा, येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. 



सदर शिबिराचे उद्घाटन यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. नीलाताई आटकळे, तसेच जकराया मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रिया जाधव यांचे हस्ते संपन्न झाले.  



नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अंजली समाधान आवताडे यांचे वतीने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती सौ.शिलाताई शिवशरण होत्या.



या मार्गदर्शन शिबिर प्रसंगी बचत गटाद्वारे यशस्वी बनलेल्या पंढरपूर येथील उद्योजिका सौ. रतन संपत थोरवत यांनी मार्गदर्शन केले.



महिलांनी महिलांना सोबत घेऊन केलेला व्यवसाय कधीच अयशस्वी होत नाही. मीही अशाच पद्धतीने बचत गटा द्वारे यशस्वी उद्योजिका म्हणून आज नावारूपाला आलेली आहे. नवकिरण महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सौ.अंजली आवताडे जो आजचा उपक्रम राबवत आहेत तो उपक्रम आता पर्यंतचा पंढरपूर मंगळवेढा मध्ये प्रथमच राबवला जात आहे. आशा प्रकारच्या उपक्रमामुळे आपल्या तालुक्यातील महिलांना सक्षम बनवून त्यांचे सबलीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे असे शेवटी त्यांनी सांगितले. 



याप्रसंगी त्यांनी बचत गट मार्फत उद्योग कसा चालवावा व कशा पद्धतीने उभा करावा याबाबतचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले.



कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. नीलाताई आटकळे आपले मनोगत मांडताना म्हणाल्या की, मी एक महिला या नात्याने 32 वर्षे एका पत संस्थेमध्ये सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतरही स्वस्थ न बसता यशोदा पतसंस्थेची स्थापना केली आणि या पतसंस्थेचे काम मी यशस्वीपणे पार पाडत आहे. 



यावेळी सौ. प्रिया जाधव म्हणाल्या की, महिलांना सक्षम बनविण्यासाठी आज पर्यंत मी माझ्या संस्थेद्वारे अनेक बचत गटांना मदत केली आहे. यापुढेही त्यांना निश्चितच मदत करीत राहणार असल्याचे सांगितले व सौ. अंजलीताई आवताडे यांनी  बचत गटांना मदत करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे तो स्तुत्य व आव्हानात्मक असून तो नक्कीच यशस्वी करतील यामध्ये कुठलीही तिळमात्र शंका नाही.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजकल्याण सभापती सौ.शीलाताई शिवशरण म्हणाल्या बचत गटाद्वारे महिलांनी एकत्र येऊन उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी उत्पादित करीत असलेल्या उत्पादनाची गुणवत्ता ही बाब महत्त्वाची आहे. आपण तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे उत्पादित झालेल्या वस्तूला शहरी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे प्रयत्नशील आहेत ते एक यशस्वी उद्योजक असल्याने महिला बचत गटाला त्यांचे मार्गदर्शन निश्चितच मोलाचे असे असणार आहे. आजपर्यंत समाधान आवताडे यांनी महिला बचत गटाला वेळोवेळी मदत केलेली आहे यापुढेही त्यांची मदत व मार्गदर्शन करण्यासाठी ते आग्रही आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व सौ. अंजलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम हा नक्कीच यशस्वी होईल. मनामध्ये कुठलीही शंका न आणता आपण सर्वांनी आवताडे परिवाराच्या पाठीमागे उभे रहावे व बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करुन महिलांना समाजामध्ये पुढे येण्यासाठी एक प्रकारे संधीच उपलब्ध करून देत आहेत.या संधीचे सोने करून घ्यावे असे उपस्थित महिलांना आवाहन केले.



नंदकुमार दुपडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना कोणते उद्योग, कोणत्या स्वरुपात, किती खर्चात करावेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. बाजारपेठेत कोणत्या उत्पादनाला जास्त मागणी आहे, उत्पादनाची प्रत याचा विचार करून आपण उद्योगात उतरले पाहिजे. दामाजी कारखान्याचे  चेअरमन समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सौ.अंजलीताई स्वतः तुम्हाला मार्केटिंगसाठी मदत करणार आहेत. यामुळे तुम्हाला ही संधी आलेली आहे त्याचे सोने करा. माझ्या 15 वर्षाच्या मार्गदर्शनामध्ये मार्केटिंगची जबाबदारी उचलणारी नवकिरण महिला प्रतिष्ठान हे पहिलेच असुन माझ्या मते महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवताडे परिवाराने महिलांसाठी घेतलेली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आलेल्या संधीचा फायदा घ्यावा नवीन उद्योग उभा करुन सक्षम बनावे असे आव्हान शेवटी त्यांनी केले.



यावेळी आपल्या आभारपर भाषणामध्ये सौ.अंजलीताई आवताडे यांनी बचत गटातील कोणत्याही महिलांना कोणतीही अडचण आल्यास मी सक्षम पणे आपल्या पाठीशी उभे राहीन व आपण केलेल्या उत्पादनाला नवकिरण महिला प्रतिष्ठानचे  वतीने योग्य प्रकारे मार्केट उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली व सर्व उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे बचत गटाच्या मुख्य प्रवर्तकांचे आभार मानले.



सुत्रसंचालन सौ.प्रियंका आवताडे व शेख मॅडम यांनी केले.



या मार्गदर्शन शिबिरासाठी पंचायत समिती, मंगळवेढ्याच्या उपसभापती सौ.विमल पाटील, जि.प.सोलापूर, नियोजन समिती सदस्य सौ. मंजुळा कोळेकर, पंचायत समिती सदस्य प्रेरणा मासाळ, सौ.उज्ज्वलाताई मस्के , दामाजी शुगर संचालिका सौ.कविता निकम, खरेदी विक्री संघ सदस्या सौ. सारिका पाटील, नगरसेविका सौ.निर्मला माने, सौ.रतन पडवळे, सौ.लक्ष्मीबाई म्हेत्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या. तसेच सदरील कार्यक्रमास पंढरपूरच्या डा.वृषाली पाटील, संत चोखामेळानगरच्या सरपंच सौ.इंदुमती शिंदे व तालुक्यातील महिला बचत गटाच्या मुख्य प्रवर्तक (सी.आर.पी.) मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर मुंबईत आज सुनावणी

मंगळवेढा नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर मुंबईत आज सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा