मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
टमटममध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणाऱ्या उसाच्या वाढ्याचे माप कमी का टाकतो, असे विचारल्याने हातातील ऊसतोडणीच्या कोयत्याने एकास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील डोके यांच्या शेतात घडली.
याबाबतची फिर्याद सागर अंबादास घाडगे (रा. भोसे) यांनी दिली आहे. स्वतःच्या ताब्यातील टमटम (एमएच 13 सीयू 7480) वाहनात उसाचे वाढे भरण्यासाठी ब्रह्मपुरी येथे गेल्यानंतर माप टाकण्यावरून हा वाद झाला. त्यात संशयित आरोपी ऊस तोडणी मुकदम धनाजी पांढरे (रा. तळसंगी) यांनी कोयत्याने मारहाण करून जखमी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज