मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांनी आज शनिवारी परिचारक गटाला जाहीर पाठिंबा दिल्याने आ.भारत भालकेंना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आ.भारत भालके यांचे मंगळवेढ्यातील अत्यंत जवळचे असलेले राहुल शहा व मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक अजित जगताप व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी आज परिचारक गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथे आज आ.प्रशांत परिचारक गटाची बैठक पार पडली यामध्ये यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भारत भालके यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल मंगळवेढा तालुक्यात शहा कुटुंबांना मानणारा मोठा वर्ग आहे.याचा फटका आमदार भालकेंना या निवडणुकीत बसणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत
आहे.
व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,माजी आरोग्य सभापती शिवानंद पाटील,दामाजी शुगरचे माजी चेअरमन चरणू पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम,उद्योजक राजेश उर्फ खन्ना माळी,काशिनाथ पाटील,जि.प सदस्य नितीन नकाते,माजी जि.प सदस्य नामदेव जानकर,भिवा दोलतोडे,माजी नगरसेवक अरुण किल्लेदार,मुझफर काझी,चंद्रशेखर कौडूभैरी,माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड,नगरसेवक अजित जगताप, बशीर बागवान,प्रशांत यादव,सद्दाम मकानदार,तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे, गौरीशंकर बुरकुल,शशिकांत चव्हाण,बाबासाहेब पाटील,विजय बुरकुल,अविनाश शिंदे,डॉ.शरद शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज