मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथील चव्हाण यांच्या शेतात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेऊन २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरसी येथील ईश्वर तेराप्मा चव्हाण यांचे शेतात दि.२० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मुकुंद भिमराव सगर,प्रविण नागने, नवनाथ मेटवारी,धर्मराज बाबर,अनंद ताठ,विनोद शिदे, प्रविण चव्हाण ,सचिन चव्हाण, विकास बेदरे,भीमराव मुदगुल ,बंडू सरकले , सुरेश कट्टे,सुर्यकांत घंटीटी, नितीन इंगळे, प्रविण लेंडवे, संदेश लोखंडे हे मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले आहे.
मुंबई जुगार कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे
मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास विक्रमसिंह राठोड हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज