अखिल भारतीय वारकरी मंडळाची बैठक मंगळवेढा येथील कुंभार गल्ली येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी या मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज होते. यावेळी ब्रह्मपुरी येथील ह भ प निलेश गुजरे यांची मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी तर मंगळवेढा येथील ह भ प ज्ञानेश्वर भगरे यांची मंगळवेढा शहर अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सोलापूर शहराध्यक्ष ज्योतिराम चांगभले, शहर सचिव बळीराम जांभळे, सोलापूर शहर युवा कार्याध्यक्ष भाऊसाहेब बेलेराव यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका व शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे-ता.उपाध्यक्ष अरूण शिवशरण, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव समाधान कलुबर्मे, सहसचिव दत्तात्रय आसबे,कोषाध्यक्ष जालिंदर कुंभार, संपर्क प्रमुख महादेव यादव,सल्लागार तुकाराम पुजारी, संपर्कप्रमुख सतिश पाटील यांची तर सदस्य म्हणून ईश्वर कोकरे,राजाराम कदम,रामचंद्र मळगे,कल्पेश कांबळे, लालचंद सुतार, युवराज शिंदे, मोहन मळगे,श्रीशैल्य कुंभार, व दत्तात्रय कोळी यांची निवड करण्यात आली. तर शहर उपाध्यक्षपदी गोपाळ कोकरे, मल्लिकार्जून राजमाने,सचिव ज्ञानोबा फुगारे,सहसचिव बजीरंग माळी,कोषाध्यक्ष मारूती भगत,सहकोषाध्यक्ष पैगंबर आतार,
संपर्क प्रमुख रमेश माने,प्रकाश शिंदे यांची तर शहर सदस्य म्हणून भीमराव पांचाळ,दगडू ठोंबरे,तानाजी चोपडे, तुकाराम नांदरेकर,श्रीनिवास शिंदे, अनंतराव जावळे,ज्योतिराम माने यांची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीला तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज