मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जून 2020 मध्ये होणाऱ्या यूजीसी-नेट परीक्षेसाठी अधिकृत सूचना जाहीर केली आहे. 15 ते 20 जूनदरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 16 मार्च ते 16 एप्रिलदरम्यान नोंदणी केली जाणार असून 15 मे रोजी परीक्षेचे ओळखपत्र दिले जाणार आहे.
5 जुलै रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. कोणत्याही परीक्षेच्या तीन महिन्यांपूर्वी एनटीएकडून अशी सूचना जाहीर केली जाते. यूजीसी-नेट ही परीक्षा ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप ऍण्ड असिस्टंट प्रोफेसर’ या पदांसाठी घेतली जाते. या परीक्षेला तीन तासांचे दोन पेपर असतात आणि परीक्षा ऑनलाइन घेतली जाते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज