मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथे होणार्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनानिमित्त टि.व्ही.चॅनलवरील प्रसिद्ध असलेले विविध कार्टून्स खास बालगोपाळांच्या भेटीस येणार असल्याने बालच्चूमध्ये याबाबत उत्सुकता आहे.
3 ऑगस्ट रोजी सकाळी मंगळवेढा शहरातील विविध मार्गांवरून साहित्य-संगीत दिंडी काढण्यात येणार असून या दिंडीत मान्यवरांसोबत विविध शाळांमधील अनेक विद्यार्थी, भजनी मंडळाचे कलावंत व अनेक महिला सहभागी होणार आहेत. तसेच दिंडीची शोभा वाढवण्यासाठी टि.व्ही.चॅनलवरील मोटू-पतलू, टॉम अॅण्ड जेरी, मिकी माऊस असे कार्टून्सही सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमस्थळी संत कान्होपात्रा नगरी असे नामकरण करण्यात आले असून या ठिकाणी सकाळी 9 ते 11 या वेळेत ही कार्टून्स बालगोपाळांसाठी उपलब्ध करण्यात आले असून पहिल्या दिवशी राज्यस्तरीय महिला संमेलन असल्याने या दिवशी महिलांसोबत येणार्या चिमुरडयांना त्यांच्या मनातील असलेली कार्टूनची पात्रे या निमित्ताने पाहता येणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज