mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ राज्यात विकासाचे मॉडेल बनविणार : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गांव माझे आहे, या मतदारसंघातील प्रत्येक कुठुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हे माझे स्वप्न आहे.या मतदारसंघाचे महाराष्ट्रात आदर्श असे मॉडेल मला बनवायचे आहे त्यासाठी या मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी असे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.ते फाटेवडी,तळसंगी,खोमनाळ,हिवरगाव,भाळवणी,निंबोणी,माळवाडी,पौट,सलगर,आसबेवाडी,शिवनगी,येळगी,सोड्डी,हुलजंती या गावच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते.

‘आमचं ठरलंय,वारं फिरलंय’ म्हणत समाधान आवताडे यांना पाठींबा देण्याचा ओघ वाढला,

आमचं ठरलंय वारं फिरलंय’अस म्हणत मतदारसंघाच्या विकासावर भाष्य करत बेरोजगारी,पाण्याचा प्रश्नलोकप्रतिनिधींनी केलेली दिशाभूल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मतदाररसंघाचा विकास समाधान आवताडेच करू शकतात असा विश्वास जनतेच्या मनात होत आहे त्यामुळे अनेक नेतेमंडळी गावागावातून पाठिंबा देत आहेत.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान महादेव आवताडे यांचा गावां-गावांतून प्रचार सभांमध्ये विविध मान्यवर जाहीर पाठिंबा दर्शवून आवताडे गटात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सभांना होणारी उस्फूर्त व प्रचंड गर्दी आणि वाढता पाठींबा यामुळे उमेदवार समाधान आवताडे यांचे बळ आणखी वाढलेले दिसून येते. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजीच्या प्रचार दौ-यांमध्ये मेजर अरविंद सांगोलकर, मेजर कारंडे, आसबेवाडीचे उपसरपंच महेश खटकाळे, मा.उपसरपंच दादासो नागणे,रमेश नागणे, बालाजी भुसे, शाम आसबे, एकलासपूरचे धर्मराज ताड महाराज, मुंढेवाडी ता.पंढरपूरचे मा.सरपंच कृष्णदेव राऊत यांचेसह अनेकांनी उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.सामान्य जनता,सामान्य मतदार आवताडे यांना पाठिंबा देत आहेत तर काही नेतेमंडळी लक्ष्मीदर्शनासाठी इतर उमेदवारांचे उंबरठे झिजवतानाही दिसत असून या मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर मंगळवेढा तालुक्यातील मतदार एकवटताना दिसत आहे .

पुढे बोलताना ते म्हणाले, पंचवीस वर्षापासून खुंटलेला विकास येत्या पाच वर्षात करुन दाखवितो. या मातीतल्या उद्योजकांना संधी मिळाल्यास ते निश्चीतच यशस्वी होवू शकतात. एवढी कुवत आणि धमक इथल्या युवकांमध्ये आहे. परंतु आजपर्यंत त्यांना योग्य दिशा ,न्याय मिळाली नाही. प्रत्येकानी आजपर्यंत फक्त मताचा जोगवा मागण्याचेच काम केले आहे. जे वय विश्रांतीचे आहे त्या वयात उमेदवारी घेवून म्हणे जनतेची कामे करणार आहेत. पाणी आणण्याची खरंच मनापासून इच्छा असती तर पाणी यापूर्वीच पाणी आले असते.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्यामागील कारण आहे. इतर नेत्यांप्रमाणे मी कांही आश्वासने देणार नाही. कारण आश्वासन देण्यापेक्षा करुन दाख्विण्यावर माझा विश्वास आहे. राजकारणाची उलथापालथ करुन ट्रॅक्टरने मशागत करण्याची वेळ आली आहे. वाढप्या ओळखीचा असला तर शेवटीच्या पंगतीच्या शेवटीच्या ओळीमध्ये जरी बसला तरी जेवण मिळते हे सभापती प्रदिप खांडेकर यांनी दाखवून दिले आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त निधी या तालुक्याला आणला आहे. तसेच जि.प.समाजकल्याण सभापाती शिला शिवशरण यांनीही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे कार्य केले आहे. आपल्या मायेची थाप यापूर्वीही अनेक वेळा आपण मला दिलेली आहे, यापुढेही देवून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,माजी उपसभापती शिवाजी पटाप, प्रा.समाधान क्षिरसागर ,हणमंत मासाळ, शिवाजी शेणवे, उत्तम केंगार,बसवंत पाटील, महादेव साखरे,गुरय्या स्वामी,ह.भ.प.धर्मराज ताड, अमर शिंदे, महेश खटकळे,नागेश मासाळ व इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

या प्रचार सभा प्रसंगी दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, संचालक बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण,पप्पू काकेकर,विजय माने, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, मार्केट कमेटी संचालक विष्णू फटे, आझाद दारुवाले,तसेच अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच या प्रचार सभेमध्ये सरपंच राजेंद्र फटे,दगडू फटे,बलभिम माने,पोपट फटे,सरपंच रविकांत खांडेकर, महादेव खांडेकर, रामचंद्र होणराव, संजय बुरंगे, सरपंच आमसिध्द माळी,सुधाकर पाटील, मळसिध्द माळी,सोसायटी चेअरमन म्हाळाप्पा माने,पितांबर निमंगरे,मोहन सांगोलकर,शंकर पाटील, वसंत बिचुकले,दत्ता गायवाले, रमेश मुंगसे,दादासो कोंडूभैरी,रंगनाथ कलुबर्मे, कुमार शिंदे, उत्तम लंगडे,श्रीकांत पुकळे,रावसो बिले,संजय धायगोंडे,चनाप्पा धायगोंडे,सुनिल कदम,आनंदा आसबे,शाम आसबे,नागेश खटकाळे,बाळासो बंडगर,सतिश लालबुरे,केशव कांबळे,दादासो दबडे,बलभिम शिंदे,जगन्नाथ पाटील,चांगदेव शिंदे,अरुण पाटील,संतोष यादव,समाधान शिंदे, यांचेसह वरील गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, समर्थक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
युवराज शिंदे यांचा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा

युवराज शिंदे यांचा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा