मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अतिवृष्टीने बाधित झालेल्या राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सहा हजार पाचशे कोटी वितरीत केले. मदतीची सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वितरीत केल्याचा तहसिलदारांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठविण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, सुमारे 13 लाख 70 हजार शेतकऱ्यांचे एक हजार 214 कोटींची रक्कम तहसिलदारांच्याच खात्यावर शिल्लक असल्याचा खुलासा सोलापुरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
दुष्काळातून सावरतानाच राज्यातील महापूर व अतिवृष्टीमुळे बळीराजाचा संसार उघड्यावर आला.
शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी
अतिवृष्टीने बाधित झालेल्या राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी सहा 500 कोटींची मदत वितरीत करण्यात आली आहे. आतापर्यंत 90 टक्क्यांहून रक्कम वितरीत केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अचूक माहिती देऊनही मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. रक्कम शिल्लक असतानाही 100 टक्के वितरीत झाल्याचा अहवाल देणाऱ्या तहसिलदारांवर कारवाई केली जाईल.
– किशोरराजे निंबाळकर, सचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज