mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पायाभूत सुविधा विकासाला प्राधान्य : नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पायाभूत सुविधा विकासाला प्राधान्य : नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच भूसंपादन, पायाभूत सुविधा, विकास आणि समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यावर भर राहील, असे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

शंभरकर यांनी आज सायंकाळी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी डॉ. भोसले यांनी                         श्री. शंभरकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शंभरकर यांनी सांगितले, ‘आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन महिने उरले आहेत, त्याअनुषंगाने राज्य शासनाने दिलेली विविध उद्दीष्टे पूर्ण करण्यावर भर राहील, केंद्र सरकारच्या त्याचबरोबर राज्य शासनाच्या फ्लॅक्सीप योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

जिल्ह्यातील भूसंपादन विषयक कामे सुरु आहेत ही कामे गतीने करण्याबरोबरच त्याचा मोबदला मिळवुन देणे यास प्राधान्य राहील. जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट यासारखी महत्वाची तीर्थक्षेत्रे असून त्यांचा नियोजनबध्द विकास आणखी गतीने व्हावा यासाठी प्रयत्न राहील. असे त्यांनी सांगितले.

समाजकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही                     श्री. शंभरकर यांनी सांगितले. नियेाजन विकास आराखडा तयार करुन त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल यासाठीही प्राधान्य राहील. असे त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शैलेश सुर्यवंशी, स्नेहल भोसले, उत्तम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर आदी उपस्थित होते.

 शंभरकर मूळचे चंद्रपुरचे असून त्यांचे शिक्षण नागपूर येथे झाले आहे. श्री. शंभरकर यांनी यापूर्वी मुंबई उपनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, मुंबई महानगरपालिका, मंत्रालय येथे विविध पदावर काम केले आहे. पुण्यात ते समाज कल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची जिल्हाधिकारी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात रस्ता ओलांडताना दुचाकीने उडवले तरुणाचा मृत्यू

सोलापुरात रस्ता ओलांडताना दुचाकीने उडवले तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा