मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा रविवार, 26 जानेवारी रोजी सोलापुरात प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर भोजन देणार्या संस्थेला प्रति थाळीकरिता 40 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या तीन महिन्यांकरिता राज्य शासनाने 25 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून दिले आहे.
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्यभरात गरिबांसाठी फक्त दहा रुपयात ‘शिवभोजन’ योजनेंतर्गत भोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार 26 जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यांत या योजनेचा प्रारंभ होत आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे.
राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता एकूण 6 कोटी 48 लाखांचा निधी जिल्हानिहाय वितरित केला आहे. यात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा खात्यास 25 लाख 20 हजारांचे अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानातून दर पंधरा दिवसांनी ‘शिवभोजन’ चालविणार्या संस्थेस अनुदान देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. संस्थेला अनुदान देताना ‘शिवभोजन’ अॅपच्या माहितीआधारे अनुदान देण्यात यावे व ‘आरटीजीएस’ प्रणालीनेच अनुदान वितरित करण्यात यावे, असेही आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज