mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी विधानसभा विरोधी पक्षनेते पदी आमदार भारत भालकेंची वर्णी लागण्याची शक्यता ?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राष्ट्रवादी विधानसभा विरोधी पक्षनेते पदी आमदार भारत भालकेंची वर्णी लागण्याची शक्यता ?

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार भारत भालके यांची विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयाला आल्यामुळे आता विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,जितेंद्र आव्हाड, भारत भालके यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मात्र त्यांच्यासह इतरही काही नावे स्पर्धेत आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना युतीला सरकार बनविण्याचा हक्क आहे, असे सांगत आम्ही प्रबळ विरोधी पक्ष असू, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्याचवेळी शिवसेनेने सत्तेत ५०-५० जागांची मागणी केली आहे. त्यावर शिवसेना अडून आहे. त्यामुळे सत्ता स्थापन होण्यास उशिर होण्याचे संकेत मिळत आहे. त्यावेळी राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

सलग तीन वेळा जनतेच्या जोरावर ‘हॅटट्रिक’ मिळवलेले आमदार भारत भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. गेल्या दोन टर्म मध्ये त्यांनी विधानसभेत मतदारसंघाच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे. विधानसभेत त्यांची डॅशिंग आमदार म्हणून ओळख आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन आमदारांची बैठक  उद्या ३० ऑक्टोबरला असून या बैठकीत विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यायचे याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार भारत भालके यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आत्ता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची तयारी दर्शवली असल्याचे बोलले जात असून यामधून आमदार भारत भालके यांच्या नावाची चर्चा सध्या तरी सुरू असून त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या तर रासायनिक शिंदी प्याल्याने एकाचा मृत्यू

मंगळवेढ्यात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या तर रासायनिक शिंदी प्याल्याने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा