मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील बीड रस्त्यावर जुन्या वादातून आठवडे बाजाराच्या दिवशीच दुपारी बारा वाजता भरदिवसा एकाने हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी सायंकाळी उशिरा दोघांना ताब्यात घेतले आहे. दोनच वर्षांनी जामखेडमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने जामखेड परिसर हादरून गेला आहे.
याबाबत जामखेड पोलिसांत बाळू डोके (रा. भुतवडा, जामखेड) याने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की पंधरा दिवसांपूर्वी त्याचा दिव्यांग भाऊ विनोद डोके याची शहरातील स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्रासमोर पैसे काढण्याच्या कारणावरून आरोपी विकास थोरात याच्याशी बाचाबाची झाली होती.
या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी केलेल्या पंचनाम्यात तेथे एक पुंगळी आढळून आली. यावेळी बाजार असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गोळीबार झालेला ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे, त्यादुष्टीने पोलिस तपास करीत आहेत.
प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील व पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, शिपाई उदय घोडके, सागर जंगम यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत. यावेळी दोन्ही आरोपीची माहिती काढून सापळा लावून त्यांना डोणगाव (ता. जामखेड) परिसरामधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज