मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चोरट्यांनी माजी सैनिक पती- पत्नी शेतात गेल्याची संधी साधून भरदिवसा त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.फर्निचरच्या लाकडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटात ठेवलेले २ लाख ४० हजार किमतीच्या १२ तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोख १५ हजार असा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ही घटना २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास सांगोला,बनकर वस्ती येथे घडली. बनकर वस्ती येथील माजी सैनिक भारत बाळासाहेब मोरे व सुरेखा भारत मोरे हे पती-पत्नी घराला कुलूप लावून दुचाकीवरून एखतपूर (मोरेवाडी) येथील शेतात गेले होते.
दरम्यान,अज्ञात चोरट्याने हीच संधी साधून त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २ लाख ४० हजार किमतीच्या सोन्यासह रोख १५ हजार असा एकूण सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.याबाबत माजी सैनिक भारत मोरे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज