mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील युवकांना रोजगार  देण्यासाठी कटीबद्ध : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील युवकांना रोजगार  देण्यासाठी कटीबद्ध : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर तालुक्यात प्रचंड आणि उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.  गावोगावी ट्रॅक्टरमध्ये समाधान आवताडे यांना बसवून मिरवणूकीने त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. त्यानंतर होणा-या सभांनाही प्रचंड जनसमुदाय प्रतिसाद देत आहे. 

खर्डी,उंबरगांव, बोहाळी,कोर्टी, शिरढोण, कौठाळी, वाखरी, टाकळी, गादेगांव आदि गावांमध्ये समाधान आवताडे यांनी गुरुवारी प्रचार दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर प्रचार सभांमध्ये बोलताना अपक्ष उमेदवार समाधान आवताडे म्हणाले, पाण्याच्या प्रत्येक पाळीसाठी जनतेला भांडत बसण्याची वेळ आलेली आहे. जे हक्काचे आहे तेही मिळत नाही. तुमच्या हक्काचे पाणी बारामती, माढयाला कुणी पळविले हे जनतेला माहित आहे. आजपर्यंत सत्ता उपभोगण्यासाठीच सत्तेचा वापर लोकप्रतिनिधीनी केलेला आहे. पंढरपूरमध्ये अशांतता माजविणे, अपप्रवृत्तीला जोपासणे याशिवाय कोणतेच काम झालेले नाही. ही निवडणूक वेगळया दिशेने नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.  

एकमेकांवर घसरुन टिका-टिपण्णी करायची आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे हाच उद्देश यामागे आहे. पंढरपूर येथे भरणारा घोड्याचा बाजार इतरत्र गेला, त्यामुळे बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे.या भागामध्ये फळबागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, या मालाला चांगला दर आणि चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे.मी बोलतो कमी पण काम मात्र जास्त करतो.अगोदर काम करतो आणि नंतर बोलणा-यातील मी आहे.  कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता मला साथ द्या,मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या ,मी कायम तुमच्या सोबत असेन असे शेवटी समाधान आवताडे म्हणाले.

या प्रचार सभांमध्ये बोलताना विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक शेखरभाऊ भोसले म्हणाले,या मतदारसंघासाठी समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही.आता जनतेनीच ही निवडणूक हातात घेतली असल्याने परिवर्तन अटळ असल्याचे ते म्हणाले.  

याप्रसंगी शांतीनाथ बागल, सत्यवान रोंगे, औदुंबर शिंदे, डॉ.वृशाली पाटील,प्रशांत मलपे,समाधान चौगुले,राजकुमार पवार, मधुकर कुलकर्णी, मारुती नागटिळक, जावेद इनामदार, दादासो तळेकर,विक्रम चंदनशिवे,अरुण जाधव सोमनाथ झंजे, सुनिल गायकवाड आदिनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन दिगंबर यादव व अशोक उन्हाळे यांनी केले.

सदरच्या प्रचार दौ-यामध्ये चंद्रभागा साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष यादव, दत्तात्रय जमदाडे,  विनोद लटके, मोहनआप्पा बागल, कुबेर पाटील, सत्यवान रोंगे, बाळासाहेब रोंगे,नाना देठे, संतोष व्यवहारे, बाळासाहेब डोके, अनिल कांबळे,सदाशिव मस्के, पांडूरंग पोरे,गणेश टिंगरे, सुधाकर फाटे, सतिश बागल,सुनिल गायकवाड, औदुंबर शिंदे, दत्तात्रय कोळेकर, सत्यवान मस्के, बाळासो सकटे,औदुंबर शिंदे, जावेद इनामदार,बंडूलाल ताड, विक्रम सकटे, योगेश कांबळे, शाहरुख शेख, आकाश मस्के, तानाजी नागटिळक, मारुती नागटिळक, अच्युत पाटील, रामकृष्ण पोरे, सिताराम नागटिळक, विजय नागटिळक, हमीद इनामदार, सतिश नागटिळक, सुधाकर जाधव, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब विष्णू जाधव, तानाजी जाधव, उत्तम जाधव, विक्रम चंदनशिवे,बिभीषण रणदिवे, पांडूरंग रणदिवे, सुरेश गायकवाड, सतिश शिंदे, दत्ता साळुंखे, सोमनाथ भाकरे, शंकर भाकरे यांचेसह वरील गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, विविध पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गुरुवारी संपन्न झालेल्या प्रचार दौ-यामध्येही समाधान आवताडे गटात प्रवेश करणा-यांचे इनकमींग सुरुच होते. यामध्ये शिरढोण येथे ग्रामपंचायत सदस्या अलका भुसनर, गणेश टिंगरे, कौठाळी येथे माजी उपसरपंच मारुती नागटिळक, पांडूरंग नागटिळक, रामचंद्र नागटिळक, सिताराम नागटिळक, बाळासो लेंडवे, गोरख नागटिळक, अमजद इनामदार, मुरलीधर नागटिळक, रवी नागटिळक, वाखरी येथे पैलवान धनाजी पांढरे, तानाजी पांढरे, राहूल पांढरे  यांचेसह अनेकांनी समाधान आवताडे गटात प्रवेश करुन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यातील शिक्षकास विदयार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

मंगळवेढ्यातील शिक्षकास विदयार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा