mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आपली घरी कोणीतरी वाट पहात आहे याची जाणीव वाहनचालकांनी ठेवावी : न्यायमुर्ती चरणकर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी कारखाना व विधी सेवा समिती मंगळवेढा बार असोसिएशन आणि मंगळवेढा तालुका पोलिस स्टेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना निमित्त मंगळवेढयाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधिश जी.एम.चरणकर यांनी कार्यस्थळावर येऊन वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती दिली.


  यामध्ये ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टर चालक व मालक यांना रस्ता सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यांत आले.  सध्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन त्यामध्ये होणारी जीवितहानी ही चिंताग्रस्त करणारी आहे 2017 ते 2019 या काळामध्ये संपूर्ण भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होवून त्यामध्ये जवळपास दीड लाख नागरिक मयत होतात यावरुन अपघाताची तिव्रता मोठया प्रमाणात दिसत आहे.सध्या जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. आपण वाहतुकीचे नियमांचे दैनंदिन आचारणात आणणे गरजेचेआहे.आपण गाडी चालविताना आपली व पाठीमागून येणा-याचे घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव असावी. नागरिकांनी व विशेषत: वाहन चालकांनी याबाबत दक्ष राहून स्वत:बरोबरच इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत चरणकर  यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळवेढा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.सुजय लवटेे यांनी केले. त्यांनी सांगितले की कायदेविषयक जुजबी शिबीर कारखान्यावर घेण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येकास कायदयाचे ज्ञान असले पाहिजे. सरकारी वकील बनसोडे बोलतांना म्हणाले की, ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफलेक्टर व बॅनर लावण्यात यावेत. तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करण्यात येऊ नये, साऊंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवू नये.नादुरुस्त वाहनांच्या दुरुस्तीकरिता वाहन रस्त्यावर उभे करण्यात येऊ नये. 

 रात्रीच्या वेळी लाईटचा पुरेपुर वापर करणेत यावा अशा अनेक प्रकारच्या बाबींचे मार्गदर्शन करण्यांत आले. बिगर इन्शुरन्सचे वाहन चालवू नये असे आवाहन बनसोडे यांनी केले.


यावेळी मंगळवेढा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.बी.एन.पटवर्धन व मंगळवेढा पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी रस्ता सुरक्षतेबाबतचे नियम सांगितले व अपघाताचे प्रमाण कमी होणेसाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी कारखान्यांकडे ऊसतोड वाहतुकीचे काम करणा-या वाहन चालक यांना सुरक्षिततेचे पालन करणेचे आवाहन करुन कारखान्यामार्फत आवश्यक ती मदत करणेचे अभिवचन दिले.


याप्रसंगी मंगळवेढा बार असोसिएशनचे सचिव अॅड.राजु बामणे, माजी अध्यक्ष अॅड. डी.सी.जाधव,  वाहतुक शाखेचे हवालदार बंडु कंुभार, कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, बाळासाहेब शिंदे, परचेस ऑफिसर भारत निकम, वक्र्स मॅनेंजर सुहास शिनगारे, प्र.चिफ केमिस्ट प्रशांत माळवदे, प्र.शेती अधिकारी रमेश पवार, प्र.चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, प्र.लेबर ऑफिसर आप्पासोा शिनगारे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्र.कार्यालय अधिक्षक दगडू फटे यांनी केले तर आभार संचालक सुरेश भाकरे यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राज्यात थंडी पुन्हा परतणार

राज्यात थंडी पुन्हा परतणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा