मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुण्यात आज एका कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू झाला असून पुण्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे . कालच या महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज या महिलेचा मृत्यू झाला.
दिल्लीतून हिंगोलीत परतलेल्या व्यक्तीला करोना पुण्यातील मध्यवस्तीत राहणाऱ्या या ५० वर्षीय महिलेला तीव्र स्वरूपाचा न्यूमोनिया झाला होता . त्यामुळे बुधवारी दुपारी या महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तिचा मृत्यू झाला . तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते , असे सांगण्यात आले असून पुण्यातील हा करोनाचा दुसरा बळी ठरला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज