
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी – २० विश्वचषकात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या १६ वर्षीय रिचा घोषने कोरोनाविरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे . रिचाने पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहायता निधीला करोनाविरुद्ध लढ्यासाठी एक लाखाची मदत केली आहे. सध्या संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढतो आहे.
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सहायता निधीला मदत करण्याची विनंती केली होती. या देशाची नागरिक म्हणून या लढ्यात सहभागी होणे हे माझे काम आहे . याच भावनेने मी मदत केल्याचे रिचा घोषने सांगितले.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












