मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील एका शेतातील विहिरीचे काम करीत असताना क्रेनची यारीची बकेट तुटून पडल्याने भारत मच्छिंद्र मोरे (वय.५० रा.घरनिकी ता.मंगळवेढा) याचा मृत्यू झाला आहे.ही घटना आज मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवेढा शहरात असलेल्या मारुती नामदेव जाधव यांच्या शेतातील विहिरीचे काम करीत असताना क्रेनची यारीची बकेट तुटून पडल्याने मयत भारत मोरे यास तोंडावर,डावे हाताला मार लागून जखमी होऊन मयत झाला आहे.
याची खबर मयताचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर बापू मोरे यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार नामदेव कोळी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज